अभिनेते गोविंदा निवडणूक लढवणार की नाहीत? राजकीय करियरमुळे चर्चेत

अभिनेते गोविंदा निवडणूक लढवणार की नाहीत? राजकीय करियरमुळे चर्चेत

अभिनेते गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय करियरमुळे चर्चेत आहे. जवळपास दोन दशकाच्या राजकीय वनवासानंतर गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाक गोविंदा यांनी प्रवेश केला. प्रवेशानंतर गोविंदा निवडणूक लढवणार की नाहीत? अशी चर्चा रंगली होती. आता याबाबतीत मोठी माहिती समोर आली आहे. गोविंदा निवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर येत आहे. फक्त शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार गोविंदा करणार आहेत.

पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांच्या होणाऱ्या मतदानासाठी गोविंदा विदर्भात प्रचार करतील. 4, 5, आणि 6 एप्रिलला गोविंदा रामटेकमध्ये प्रचार करतील. 11, 12 एप्रिलला गोविंदा यवतमाळ, त्यानंतर अभिनेते 15, 16 एप्रिलला हिंगोली याठिकाणी प्रचार करणार आहेत. 17 आणि 18 एप्रिलला गोविंदा बुलढाणा याठिकाणी गोविंदा प्रचार करणार आहेत.

सांगायचं झालं तर, मुंबईतून गोविंदा यांना लोकसभा तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता गोविंदा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर गोविंदा फक्त प्रचार करणार आहे. गोविंदा शिंदे गटाचे स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे.

गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत.  सिनेमांमध्ये काम करण बंद केल्यानंतर गोविंदा यांनी राजकारणात प्रवेश केला.  2004 साली गोविंद जायंट किलर ठरले होते. गोविंदा यांचे भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर ते अचानक राजकारणापासून दूर गेले. आता पुन्हा राजकीय करियरमुळे गोविंदा चर्चेत आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;