चिमुकल्यांना जीवदान! 3800 मुलांवरील हृदय शस्त्रक्रियेसाठी योगदान, गायिका पलक मुच्छिलची गिनिज बुकात नोंद
गायिका पलक मुच्छल आपल्या गायकीबरोबरच सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. पलकची आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समने नोंद घेतली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पलकची दखल तिच्या गायकीसाठी नव्हे तर, समाजसेवेसाठी घेतली आहे.
गायिका पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून 3800 हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केली आहे. लहानपणी पलक एका रेल्वे प्रवासादरम्यान वंचित मुलांना भेटली होती. त्या क्षणापासून तिच्या आयुष्याला एक ध्येय मिळाले. त्या दिवशी तिने मनातल्या मनात स्वत:ला वचन दिले मी एकेदिवशी या सर्वांची मदत नक्कीच करेन. काही वर्षांनंतर ते वचन तिच्या संस्थेमागील प्रेरणा बनले. ती तिच्या संगीत कार्यक्रमांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा आणि तिच्या स्वतःच्या बचतीचा वापर वैद्यकीय सेवेसाठी करते.
पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मुलांसोबत दिसत आहे. पलकने अनेक वर्षे कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे आणि गुजरात भूकंप पीडितांना 10 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. ‘मेरी आशिकी’, ‘कौन तुझे’, आणि ‘प्रेम रतन धन पायो’ सारख्या गाण्यांनी मोठ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही पलकने तिची कमाई तिच्या फाउंडेशनला योगदान करणे सुरू ठेवले. तिचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील नोंदवले गेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List