Video -ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा अनावधानाने गेला तोल
‘बॉलीवूडचे जम्पिंग जॅक’ अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते जितेंद्र सध्या चर्चेत आहेत. जितेंद्र यांचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते चालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. मात्र त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे. हा व्हि़डीओ व्हायरल झाल्य़ानंतर चाहत्यांनी त्यांना काळघी घ्या…, असा सल्ला दिला.
प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर झरीन खान यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी झरीन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तेव्हा जितेंद्र देखील उपस्थित होते. यावेळी ते गाडीतून उतरत होते. तेव्हा जितेंद्र यांनी पापाराझींकडे पाहिले आणि आत जाण्यासाठी पुढे सरकताच त्यांचा पाय समोरच्या पायरीवर आदळला. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले. हे पाहून लगेचच तेथे उपस्थित असलेले लोक आणि सुरक्षा रक्षक त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांना उठवण्यासाठी मदत केली. यानंतर व्हिडीओमध्ये जितेंद्र हसताना दिसले.
जितेंद्रंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “आम्हाला आशा आहे की ते ठीक असलील, असे म्हटले आहे. जितेंद्र जी काळजी घ्या असेही एका युजरने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List