डेव्हिड स्झालाय यांच्या फ्लेश कांदबरीला यंदाचा बुकर पुरस्कार

डेव्हिड स्झालाय यांच्या फ्लेश कांदबरीला यंदाचा बुकर पुरस्कार

कॅनेडियन-हंगेरियन-ब्रिटिश लेखक डेव्हिड स्झालाय यांनी सोमवार रोजी “फ्लेश” या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी एका सामान्य माणसाच्या अनेक दशकांतील आयुष्याची कथा सांगते

51 वर्षीय स्झालाय यांनी अँड्र्यू मिलर आणि किरण देसाईसारख्या दिग्गजांना मागे टाकत हा प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार पटकावला आहे. स्झालाय यांना 50 हजार इतकी रोख रक्कम मिळणार आहे.

त्यांची निवड 153 सादर झालेल्या कादंबऱ्यांमधून करण्यात आली होती. “फ्लेश” ही ‘जगण्याबद्दल आणि जगण्याच्या विचित्रतेबद्दल’ असलेली कादंबरी आहे. पाच तासांच्या चर्चेनंतर सर्व न्यायाधीशांच्या एकमताने विजेती म्हणून निवडली गेली.

स्झालाय यांची ही कादंबरी मितभाषी इस्त्वानच्या आयुष्याचा मागोवा घेते. ज्याचे आयुष्य किशोरावस्थेतील एका वयस्क स्त्रीबरोबरच्या नात्यापासून ब्रिटनमधील संघर्षमय स्थलांतरित आयुष्य आणि नंतर लंडनच्या उच्चभ्रू समाजातील जगण्यापर्यंत पसरलेले आहे. लेखकाने सांगितले आहे की त्यांना एका हंगेरियन स्थलांतरिताबद्दल आणि “शरीराच्या अनुभवातून जगणे म्हणजे जगात एका जिवंत शरीरासारखे अस्तित्व” याबद्दल लिहायचे होते.

कॅनडामध्ये जन्मलेले, ब्रिटनमध्ये वाढलेले आणि सध्या व्हिएन्नामध्ये राहणारे स्झालाय यांना यापूर्वी 2016 मध्ये “ऑल दॅट मॅन इज” या कादंबरीसाठी बुकरच्या अंतिम यादीत स्थान मिळाले होते. जी नऊ विविध पुरुषांच्या कथा सांगणारी कादंबरी आहे. फ्लेश या कादंबरीचे अनेक समीक्षकांनी कौतुक केले, पण काहींनी तिच्या संथ आणि अपूर्ण कथनावर नाराजी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही… बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही…
गायी, म्हशीचे दूध पिणे सामान्य गोष्ट आहे. पण अनेकजण बकरीचे दूधही पितात. याशिवाय ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बकरीचे दूध...
हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी हळदीसोबत हे पदार्थ खायलाच हवेत
सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार… उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Renuka Shahane: तुला महिन्याला स्टायपेंड देईन,पण माझ्यासोबत…; रेणुका शहाणेंने केली निर्मात्याची पोलखोल
Delhi Bomb Blast – लखनौतील महिला डॉक्टर शाहीनच्या गाडीत सापडली AK-47! दिल्ली बाॅम्बस्फोटाशी तिचेही कनेक्शन
मोहम्मद शमीसंदर्भात सौरव गांगुलीचे महत्त्वाचे विधान, सिलेक्टर्सना दिला सल्ला
सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला तीन दिवस राहणार बंद, दिल्लीचे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद