Nanded Election – नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोडतीत २० प्रभागातील 41 जागा महिलांसाठी राखीव
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. २० प्रभागातील ८१ वार्डापैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम व उपायुक्त अजितपालसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रभागाचे प्रभारी अधिकारी नितीन गाढवे यांनी आरक्षणाचा सर्व मसुदा उपस्थितांसमोर ठेवला. २०११ च्या लोकसंख्येनुसार नांदेडची लोकसंख्या ५ लाख ५० हजार ४३९ एवढी आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या एकूण २० प्रभागात ८१ उमेदवार निवडून द्यायचे असून, त्यातील ४१ महिला आहेत. भाग क्र.२० मधून पाच उमेदवार तर उर्वरित १९ प्रभागातून ४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
प्रप्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे. प्रभाग क्र.१-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.२-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.३-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.४-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-अनुसूचित जमाती महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.५-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.६-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.७-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.८-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.९-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१०-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.११-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला, क आणि ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१२-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, ब आणि क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१३-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क आणि ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१४-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१५-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, ब आणि क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१६-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, ब आणि क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१७-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब-सर्वसाधारण महिला, क आणि ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१८-अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र.१९-अ-अनुसूचित जाती पुरुष, ब-अनुसूचित जमाती पुरुष, क-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ड-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.२०-जो पाच उमेदवारांचा आहे. त्यात अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, ड-सर्वसाधारण महिला, ई-सर्वसाधारण पुरुष.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. मात्र इतर मागास प्रवर्गाला देण्यात येणार्या जागांबाबत अन्याय झाल्याने ०.८७ टक्क्याला ० मूल्यांकन न देता ८७ टक्के अपूर्णांकाला पूर्णांक देवून ओबीसीच्या जागा वाढवून देण्याची मागणी यावेळी महानगरप्रमुख प्रकाश मारावार, सचिन पाटील आदींनी केली. अन्य मंडळींनीही याबाबत ही मागणी लावून धरली. वास्तविक ओबीसी आरक्षणामधील जागा संदर्भात मनपात अन्याय झाला असून, २१ ऐवजी २२ जागा २७ टक्क्यांच्या आरक्षण धोरणानुसार देण्यात याव्यात, या मागणीसाठी आम्ही न्यायालयीन लढा देणार असून, याबाबतचा आक्षेप आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List