ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप, वसईच्या कोर्टातून पळाला… वाडीत सापडला

ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप, वसईच्या कोर्टातून पळाला… वाडीत सापडला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी दानिश खान उर्फ जमीर (23) याला अटक करून पोलिसांनी त्याला आज वसई न्यायालयात हजर केले. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला. अर्ध्या तासानंतर वसईतील एका वाडीतून पोलिसांनी या नराधमाला शोधून काढले. ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप घालून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
शुक्रवारी नालासोपारा पूर्वेच्या धुमाळनगर परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर नराधम दानिशने बलात्कार केला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा दोनच्या पथकाने ४८ तासांच्या आत आरोपीला नालासोपारा येथून अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज दुपारी आरोपी दानिश खानला वसई न्यायालयात हजर करण्यात आले होते.

प्रसाधनगृहात जाण्याच्या बहाण्याने चकवा
दानिश खानला कोर्टात आणल्यानंतर प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करून पोलिसांना चकवा देऊन तो पसार झाला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्याचा शोध सुरू करण्यात आला. वसई पंचायत समिती येथील एका वाडीत तो गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांची पथके या वाडीत शिरली. तेथील एका घरात ड्रममध्ये तो लपला होता. पोलिसांनी ड्रममधून खेचून काढून त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात डांबले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या स्फोटामागे मोठा कट तर नाही ना? दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला संशय या स्फोटामागे मोठा कट तर नाही ना? दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला संशय
    लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबाबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Video -ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा अनावधानाने गेला तोल
Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटातील कार आमची नाही, आमची मुलं दिल्लीला गेलीच नाहीत; कुटुंबीयांचा दावा
डेव्हिड स्झालाय यांच्या फ्लेश कांदबरीला यंदाचा बुकर पुरस्कार
धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, ईशा देओलने दिली मोठी अपडेट
कल्याण, टिटवाळ्यात रहिवाशांचा आज ड्राय डे; 12 तास पाणीपुरवठा बंद
नवे ठाणे, कोपरी सॅटिस आणि पाण्याच्या टाक्यांचा कासव झाला, अडीच वर्षे उलटली तरी स्मार्ट सिटी नाही; तीन प्रकल्प रखडले