PMC Election 2025 – आरक्षण सोडत जाहीर, 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी
आगामी महापालिका निवडणुकांसाठीची पुणे महापालिकेच्या आगामी आरक्षणाची सोडत मंगळवारी (11 नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडली. यावेळी महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहे. यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे.
यंदा महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये तब्बल 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. महिलांच्या 83 जागामध्ये महिला खुला प्रवर्ग 48, ओबीसी महिला 23,एसी महिला 11, एसटी महिला 1 अश्या तर पुरुष मध्ये सर्वसाधारण 48,ओबीसी सर्वसाधारण 22,एस सी पुरुष 11, एस टी पुरुष 1 असं जाहीर करण्यात आलेलं आहे.
17 नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केलं जाणार आहे. तसेच त्यावर हरकती सूचना सादर करण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे. यानंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
येत्या 17 नोव्हेंबरला या आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर या प्रारुपावर 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती आणि सूचना सादर केल्या जाणार आहेत. 24 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत असणार आहे. या संदर्भातील हरकती महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपामध्येच स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे पाठविल्यास त्या गृहित धरल्या जाणार नसल्याचे कळवण्यात आले आहे. अंतिम आरक्षण सोडत ही 2 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List