तब्बल तीन तासाच्या थरारानंतर कोल्हापुरात बिबट्या जेरबंद, उच्चभ्रू वसाहतीत एका हाॅटेलमधुन शिरला
कोल्हापूरातील नागाळापार्क या उच्चभ्रू वस्तीतील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यावयाशेजारी रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली.काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. हॉटेलमधून बिबट्याने पलिकडे बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला अखेर जाळ्या टाकून जेरबंद करण्यात आल्याने, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सकाळी साडे अकराच्या सुमारास हा बिबट्या बाजूच्या इमारतीमधून हॉटेलच्या लाॅन मध्ये आला.यावेळी बाकड्यावर बसलेल्या एका जोडप्याच्या मागाहून येत त्याने,काम करत असलेल्या माळ्यावर झडप घातली. त्याच्या आरडाओरड्याने तो पलिकडे एका चेंबरमध्ये लपून बसला होता.
तब्बल तीन तासाच्या थरारानंतर कोल्हापुरात बिबट्या जेरबंद pic.twitter.com/l4VwvY9BHR
— Saamana Online (@SaamanaOnline) November 11, 2025
दरम्यान हा बिबट्या कोठून आला याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीही रुईकर कॉलनी येथे उच्चभ्रू वसाहतीत बिबट्या आला होता. त्याला पकडल्यानंतर त्याला घेऊन जाताना वाटेत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आज बिबट्या पुन्हा एकदा उच्चभ्रू वसाहतीत आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण मिळाले. गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी याच नागळा पार्कातील विवेकानंद कॉलेजच्या परिसरात एका वॉचमनला बिबट्या सदृश्य प्राण्याच्या डरकाळीचा आवाज येत होता. त्यावेळीही शोध घेण्यात आल्यानंतर तो कुत्र्याचा आवाज असल्याचे समजून विषय सोडून देण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List