दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आपल्या शरीरासाठी दूध आणि केळी हे दोन्ही पदार्थ कायमच आरोग्यवर्धक मानले गेले आहेत. खासकरून हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याचे खूप फायदे आहेत. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने आपण ताजेतवाने राहतो. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये दूध केळी दोन्ही पदार्थ एकत्र करुन, शिकरणाच्या रुपात खाल्ले जातात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दुधात मिसळलेले केळी सेवन करण्याचे खूप फायदे आहेत.
रिकाम्या पोटी दूध केळी खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते.
केळीमध्ये भरपूर फायबर असते, तर दुधात भरपूर प्रथिने असतात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
दुधात कॅल्शियम भरपूर असते, तर केळीमध्ये खनिजे भरपूर असतात. रिकाम्या पोटी दुधासोबत केळी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात. शिवाय, ते तुमचे दात मजबूत करते. जर तुम्हाला सांध्यांच्या समस्या असतील तर तुम्ही दररोज सकाळी ते नक्कीच सेवन करावे.
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दुधात मिसळून केळी खावी. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे खाल्ल्याने भूक कमी होते आणि आपले पोट भरलेले राहते.
हिरव्या मिरच्या महिनाभर टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स अमलात आणायलाच हव्यात, वाचा
हृदय निरोगी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर तुम्ही दुधासोबत केळी खावी. दुधात कॅल्शियम असते आणि केळीमध्ये पोटॅशियम असते. हे दोन्ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List