वरळी कोळी महोत्सवात संस्कृती, परंपरेची मेजवानी; समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि झणझणीत झिंगा फ्राय, भरलेले खेकडे!

वरळी कोळी महोत्सवात संस्कृती, परंपरेची मेजवानी; समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि झणझणीत झिंगा फ्राय, भरलेले खेकडे!

समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, थंड हवेची झुळूक आणि सोबतच गरमागरम झिंगा फ्राय, बोंबील, झणझणीत तिखले, भरलेले खेकडे याचा आस्वाद घेण्याची संधी वरळी कोळी महोत्सवात खवय्यांना घेता येणार आहे. वरळीत ‘कोळी खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात वरळी सी फेस, स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे चौकासमोर कोळी महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे 11 वे वर्ष आहे.

कोळी बांधव म्हणजे मुंबईचे मूळ रहिवासी. मुंबईत प्रत्येक कोळीवाडय़ात त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपलेली दिसून येते. हीच कोळी बांधवांची खरी ओळख आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची वैशिष्टय़पूर्ण खाद्य संस्कृती, त्यांचे मसाले, मासे बनवण्याची पद्धत आणि त्याची लज्जत. याच खाद्य संस्कृतीची ओळख मुंबईकरांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशाने दरवर्षी वरळी कोळी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही महोत्सवाच्या माध्यमातून लज्जतदार कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी  मुंबईकरांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांनी केले आहे.

महोत्सवाचे आकर्षण

z 31 ऑक्टोबर सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते वरळी कोळी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन, मान्यवरांचा सत्कार, अस्तिक बॅण्ड पथक.

z 1 नोव्हेंबर रोजी- कोळीगीतांचा कार्यक्रम ‘नाखवा माझा, दर्याचा राजा.’

z 2 नोव्हेंबर कोळीनृत्याचा कार्यक्रम, ‘खेळ खेळला दर्यावरी.’

स्थळ वरळी सी-फेस, स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे चौकासमोर, वरळी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;