दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईत सर्वत्र गस्त आणि नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, मॉल, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत असून हॉटेल आणि लॉजिंगमध्येही तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावरील अफवांवर देखील लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर नाकाबंदी लागू करण्यात येत आहे. नोएडा आणि गाझियाबादमधील पोलिसांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List