Kolhapur News – मावळत्या सोनसळी किरणांचा श्री अंबाबाईला अभिषेक 

Kolhapur News – मावळत्या सोनसळी किरणांचा श्री अंबाबाईला अभिषेक 

दक्षिणायनमध्ये होणाऱ्या किरणोत्सवाच्या आज (10 नोव्हेंबर 2025) दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनसळींनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक घातला. सूर्याच्या किरणांनी देवीचे मुख उजळून गेले होते. हेमाडपंती स्थापत्य शास्त्राचा हा अद्भुत सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहून अनुभवला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ आणि हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये तीन दिवसांचा होणारा किरणोत्सव सोहळा समस्त भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. दक्षिणायणमध्ये रविवारपासून किरणोत्सवास सुरूवात झाली. पुर्वसंध्येला केलेल्या पाहणीत सूर्याची मावळतीची किरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून, खांद्यावर येऊन लुप्त झाली होती. तर काल पहिल्या दिवशीही याची पुनरावृत्ती होऊन, किरणे देवीच्या कानापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीच किरणोत्सव पूर्ण क्षमतेने पूर्ण होण्याचा अंदाज असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे महाद्वारातून आत आली. ५.४२ वाजता देवीच्या चरणांना स्पर्श करत किरणे गुडघ्यावर आली. ५.४३ वाजता कमरेपर्यंत तर ५.४५ वाजता खांद्यापर्यंत पोहोचली. ५.४६ वाजता किरणांनी देवीचा चेहरा उजळून निघाला. ५.४८ वाजता किरिटावर पोहचून किरणे लुप्त झाली. तिसऱ्या दिवशी पूर्ण होणारा किरणोत्सव आजच पूर्ण झाल्याने भाविक तसेच अभ्यासक आणि मंदिर प्रशासन अत्यानंद व्यक्त करत होते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली शक्यता दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली शक्यता
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हा...
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, दिल्लीत हाय अलर्ट जारी
रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
Kolhapur News – मावळत्या सोनसळी किरणांचा श्री अंबाबाईला अभिषेक 
Ratnagiri News – कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले, मग भूताने हत्या केल्याचा बनाव; आरोपी पतीला जन्मठेप
दापोलीत करवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम