फलटण प्रकरणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी किंवा मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे! – वडेट्टीवर
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, कारण पोलीस निर्ढावले आहेत. त्यांना पाठीशी घातले जाते, सामान्य माणूस तक्रार ही करू शकत नाही,अशी स्थिती असताना न्याय कसा मिळणार? फलटण प्रकरणात कोणत्याही पक्षाचा नेता असू दे, त्यांची माणसे असू दे. महिला डॉक्टरच्या प्रकरणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे किंवा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकीकडे पिकाची कापणी सुरू झालेली असताना हाताशी आलेले पिक गेल आहे. धान,कापूस,सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे,या शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली.
विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अजून वाढू शकते. अवकाळी पावसाने जे पीक आहे त्याचा दर्जा कमी झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर देखील मिळणार नाही. अशा वेळी बळीराजा मोठ्या अडचणीत आलेला आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना ठोस मदत करावी असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. मंत्री बावनकुळे हे समाजाची दिशाभूल करत आहे. हा शासन निर्णय जरी मराठवाड्या पुरता असला तरी एकदा मिळालेले प्रमाणपत्र हे कुठेही वापरता येऊ शकते. नागपुरात मोर्चा काढल्यावरही सरकारने कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी नागपुरात बैठक होणार आहे. विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांबरोबर बैठक होऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार, अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List