चांदी दोन दिवसांत 3500 रुपयांनी घसरली
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. चांदी दोन दिवसांत 3500 रुपयांनी घसरली आहे. चांदी सध्या 1 लाख 50 हजार 900 रुपये प्रति किलो विकली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सणासुदीचे दिवस, गुंतवणूकदारांची वाढती मागणी आणि जागतिक बाजारात अस्थिरता यामुळे सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती, परंतु आता डॉलरची मजबुती, महागाईची शक्यता आणि गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून नफेखोरी सुरू केल्यामुळे सोने व चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. आगामी काळात जगात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली तरच सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते, अन्यथा सोने आणि चांदी आणखी स्वस्त होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईत 24 पॅरेट सोने 1 लाख 22 हजार 450 रुपये प्रति तोळा, तर 22 पॅरेट सोने 1 लाख 12 हजार 240 रुपये प्रति तोळा विकले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List