‘वर्षा’वर सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बैठकांचे सत्र, महायुतीत साडेतीन तास खलबते

‘वर्षा’वर सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बैठकांचे सत्र, महायुतीत साडेतीन तास खलबते

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपसाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा तारीख संपली आहे. भाजपने आठवी यादी जाहीर केली आहे. परंतु राज्यातील जागा वाटपाची कोंडी संपलेली नाही. यामुळे वाद असलेल्या जागा सोडून महायुतीमधील तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी महायुतीमधील शिवसेना-भाजपची सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’वर बैठक झाली. शुक्रवारनंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे चर्चेच्या फेऱ्या सुरुच होत्या. शनिवारी तब्बल साडेतीन तास खलबते झाले. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या चर्चेत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण येथील जागेवर भाजपचा दावा केला जात आहे.

या नेत्यांची उपस्थिती

महायुतीतील जागा वाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर पुन्हा शनिवारी खलबते झाले. बैठकीसाठी सुरुवातील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 11.30 ला वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर उदय सामंत रात्री 12.15 ला वर्षावर दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते संजय शिरसाठ यांच्यात चर्चा झाली. वर्षावर रात्री उशिरार्यंत तीन वाजेपर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल साडेतीन तास चर्चा झाली.

श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती

वर्षावर देवेंद्र फडणवीस 11.30 ला दाखल झाले. त्यानंतर रात्री तीन वाजता देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून बाहेर निघाले. देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर श्रीकांत शिंदे वर्षावर दाखल झाले. यामुळे या चर्चेत कल्याण आणि ठाणे येथील जागेच्या विषयाची चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याणऐवजी ठाणे येथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

रात्री अशा घडल्या घडामोडी

  • रात्री १०:३० ला संजय शिरसाठ वर्षावर
  • ११:२३ च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरुन वर्षावर दाखल
  • १२:०० च्या दरम्यान संजय शिरसाठ वर्षावरून बाहेर पडले
  • ११:३२ च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल
  • ३:०० वाजता देवेंद्र फडणवीस वर्षावरून सागर निवासस्थानी रवाना
  • ३:१० ला खासदार डॉ श्रीकांत शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल

हे ही वाचा

कल्याणच्या सुभेदारीवरून राजकीय घमासान, श्रीकांत शिंदे कल्याण की ठाण्यात?

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;