भक्तांच्या काटेरी ढिगांवर उड्या; गुळुंचेची काटेबारस यात्रा उत्साहात
राज्यात प्रसिद्ध असलेली पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतार्लिंग महाराजांची काटेबारस यात्रा रविवारी मोठय़ा उत्साहात साजरी झाली. ‘हर हर भोले… हर हर महादेवा’च्या गजरात गुलालाने चिंब झालेल्या शेकडो भक्तांनी भगवान शिवाप्रति असलेल्या श्रद्धेने पाण्यात सूर मारावा तसा बाभळीच्या काटेरी ढिगाऱ्यात उड्या घेत लोळत होते. हे पाहून उपस्थित असलेल्या हजारो भाविकांसह महिला व शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
भक्ती आणि शक्तीचे प्रेरणा देणाऱ्या तसेच तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा असलेल्या गुळुंचे गावचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतार्लिंग महाराजांच्या काटेबारस यात्रेस दीपावली पाडव्यादिवशी ज्योतार्ंलग मंदिरात घटस्थापना करून सुरुवात झाली. यात्राकाळात ज्योतार्लिंग मंदिराला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर, गेली बारा दिवस शेकडो समई तेवत होत्या.
गुळुंचे येथील ज्योतार्ंलगाच्या काटेबारस यात्रेचा मुख्य दिवस कार्तिक द्वादशी बारसेला असतो. यावेळी भक्त सुकलेल्या बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांवर उघड्या अंगाने पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे उड्या घेतात, हे या यात्रेतील प्रमुख वैशिष्टय़ तसेच आकर्षण मानले जाते. त्यामुळे ज्योतार्लिंगाची ही यात्रा ‘काटेबारस यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 दिवस नियमितपणे छबिना, काकडआरती, कीर्तन-भजन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. द्वादशीला पहाटेपासूनच असंख्य शिवभक्तांनी देवाला ओल्या अंगाने दंडवत घालण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवाच्या पालखीने बहिणीच्या भेटीसाठी टाळ-मृदंगांच्या व ढोल-ताशांच्या गजरात ज्योतार्लिंग मंदिरापासून प्रस्थान केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List