बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबुत येथे सलग 20 दिवसात तीन जणांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. मात्र तरीही याबाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्यामुळे बिबट्याची दहशत संपवण्यासाठी अंतिम लढा म्हणून पुणे नाशिक महामार्ग रस्ता रोको करण्यात आला आहे. या रस्ता रोको मध्ये आंबेगाव व शिरूर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्ग ठप्प झाला असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे.
पालकमंत्री व वनमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, दीपक माणूस संघर्ष टाळण्यासाठी ठोस्फोटी आराखडा तयार करावा, बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करावी, जांबुत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या साठी पुणे नाशिक महामार्ग आंदोलन सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List