भरकटलेल्या मासेमारी बोटीतील ट्रान्सपॉट यंत्रणा बंद असल्याने लोकेशन ट्रेस झाले नाही, मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर

भरकटलेल्या मासेमारी बोटीतील ट्रान्सपॉट यंत्रणा बंद असल्याने लोकेशन ट्रेस झाले नाही, मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर

अरबी समुद्रात उसळलेल्या मोंथा वादळामुळे भरकटलेल्या अनेक मच्छीमार बोटींमधील ट्रान्सपॉट, व्हीटीएस, व्हीएचएन या यंत्रणा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या बोटी समुद्रात नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत याचा शोध घेण्यात तटरक्षक दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना अडचण येत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या विभागाने आज बोटींचे मालक मच्छीमार आणि खलाशांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षित मासेमारीसाठी मार्गदर्शन केले. सुरक्षा यंत्रणा बंद न करण्याच्या सूचनाही दिल्या.

सात दिवसांपूर्वी अरबी समुद्रात उसळलेल्या मोंथा वादळात राज्यातील अनेक मच्छीमार बोटी भरकटलेल्या होत्या. भरकटलेल्या मच्छीमार बोटी खलाशांसह सुखरूप विविध बंदरात दाखल झालेल्या आहेत. मात्र या वादळात भरकटलेल्या मच्छीमार बोटींशी संपर्क होऊ शकला नसल्याने मालक, तांडेल, खलाशी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने चौकशी केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमार बोटींतील ट्रान्सपॉट, व्हीटीएस आदी यंत्रणा बंद करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या यंत्रणांचा मच्छीमार वापर करण्याचे टाळत असल्याचे उघड झाले.

– भरकटलेल्या मच्छीमार बोटींमध्ये संपर्कासाठी असलेल्या या यंत्रणा कार्यान्वित नसल्यानेच या बोटींशी संपर्क साधणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी तातडीने आज या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सर्वांना सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याची शपथ देण्यात आली.

– सहआयुक्त युवराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करंजा येथील द्रोणागिरी देवीच्या सभागृहात हा जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील, परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे, अखिल महाराष्ट्र मच्छीमार महासंघाचे अध्यक्ष विकास दाभोळकर, उपाध्यक्ष विष्णू नाटेकर आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या एक आठवडा आधी महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. २० वर्षांपासून...
हिंदी माझी मावशी, माय मरो मावशी जगो! प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
Mumbai News – वारंवार परदेश दौरै करणाऱ्या महिलेला वाढीव पोटगी देण्यास नकार, सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
ॲमेझॉनने पहाटे दोन मेसेज केले, 14 हजार कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला
‘समीक्षा’ प्राचीन हिंदुस्थानी शास्त्रार्थांचा अनुभव देणारी स्पर्धा, वैदिक परंपरांविषयी जागृतीचा अनोखा प्रयत्न
रत्नागिरी शहरातील समस्यांना वाचा फोडणारी पदयात्रा, शिवसेनेच्या पदयात्रेने शहर ढवळून निघाले
Photo – शिवसेनेत इनकमिंगचा धडाका, उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत