बंगळुरूमध्ये रुग्णवाहिकेची तीन दुचाकींना धडक, दोघांचा मृत्यू
बेंगळुरूमधील रिचमंड सर्कल परिसरात रात्री मोठा अपघात झाला. एका रुग्णवाहिकेने तीन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेने एका दुचाकीला तब्बल 50 मीटरपर्यंत ओढत नेले.
रुग्णवाहिका चालकाची ओळख शंकर अशी झाली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ट्रॅफिक वेस्ट बेंगळुरूचे डीसीपी अनुप शेट्टी यांनी सांगितले की आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून या घटनेबाबत आणखी माहिती गोळा केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List