दगाबाज रे! उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून शेतकरी संवाद दौरा, सरकारच्या फसव्या योजनांचा करणार पर्दाफाश

दगाबाज रे! उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून शेतकरी संवाद दौरा, सरकारच्या फसव्या योजनांचा करणार पर्दाफाश

अतिवृष्टीने पिकांसह शेतकऱयांचे घरदार वाहून गेले. 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होईल असे आश्वासन देऊनही महायुती सरकारने ते पाळले नाही. निसर्गाचा कोप आणि सरकारकडून झालेली फसवणूक यामुळे अन्नदाता बळीराजा निराश आणि हवालदिल झाला आहे. त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मराठवाडा दौरा करणार आहेत. ‘दगाबाज रे’ या शीर्षकाखाली होणाऱया या दौऱयात उद्धव ठाकरे हे सरकारच्या फसव्या योजनांचाही पर्दाफाश करणार आहेत.

मराठवाडय़ाला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. लाखो हेक्टर पिकांचा चिखल झाला. शेतं खरवडून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. 25 सप्टेंबर रोजी मराठवाडय़ातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता व त्यांना धीर दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या भागांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत या दौऱयाची माहिती दिली. या दौऱयात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व अन्य पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत.

या पत्रकार परिषदेला शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, संतोष खेंडके, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, विद्या अग्निहोत्री, अनिता मंत्री आदींची उपस्थिती होती.

असा असेल दौरा

गुरुवार 6 नोव्हेंबर : सकाळी 10 वाजता ः धाराशीव तालुक्यातील करंजखेडा येथील शेतकऱयांशी संवाद

  • दुपारी 12 वाजता : लातूरच्या औसा तालुक्यातील भुसणी
  • दुपारी 2 वाजता : अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी
  • दुपारी 4 वाजता : नांदेडच्या लोहा तालुक्यातील पार्डी
  • सायंकाळी 7 वाजता भोकर येथील तलाव रिसॉर्ट येथे नांदेड व हिंगोली जिल्हा पदाधिकाऱयांसोबत चर्चा

शुक्रवार 7 नोव्हेंबर

  • सकाळी 10 वाजता : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱयांशी संवाद
  • दुपारी 12 वाजता : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा
  • दुपारी 2 वाजता : औढा तालुक्यातील जवळाबाजार
  • सायंकाळी 4 वाजता : परभणी तालुक्यातील पिंगळी स्टेशन
  • सायंकाळी 7 वाजता : परभणी येथील शासकीय विश्रामगृहात परभणी लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱयांसोबत चर्चा

शनिवार 8 नोव्हेंबर

  • सकाळी 10 वाजता : परभणीच्या मानवत तालुक्यातील ताडबोरगाव
  • सकाळी 11.30 वाजता : सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव
  • दुपारी 2 वाजता : परभणी, जालना जिह्यांत परतूर तालुक्यातील पाटोदा
  • सायं. 4 वाजता : घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी येथील शेतकऱ्यांशी संवाद.
  • सायंकाळी 6 वाजता : सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर-जालना लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱयांसोबत चर्चा करतील.

या दौऱ्यात उद्धव ठाकरे मराठवाडय़ातील गावागावांत जाऊन चावडी, पारावर बसून शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज, नुकसानभरपाईची रक्कम मिळाली की नाही याची माहिती ते घेणार आहेत.

5 नोव्हेंबर

  • छत्रपती संभाजीनगर येथून दौऱयाला प्रारंभ. सकाळी 10 वाजता – पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱयांशी संवाद
  • सकाळी 11.30 – बीड तालुक्यातील पाली
  • दुपारी 2 वाजता – धाराशीवच्या भूम तालुक्यातील पाथ्रुड
  • दुपारी 3.30 वाजता – परंडा तालुक्यातील शिरसाव
  • सायंकाळी 5 वाजता – सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील घारी
  • सायंकाळी 7 वाजता – धाराशीव येथील शासकीय विश्रामगृहात धाराशीव, बीड, लातूर जिह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा...
बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
सहा वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘या’ रहस्यमय चित्रपटात दिसणार केमिस्ट्री
मद्यधुंद व्यक्तीने तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकले; आरोपीला अटक
पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
कोलकत्ता हादरलं, 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार; आरोपीला अटक
ट्रम्प यांची नवी खेळी! पुतिन, जिनपिंग यांचे केले कौतुक; या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार कठीण असल्याचे केले स्पष्ट