वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाचा घोळ; महाराष्ट्र सरकारविरोधात हायकोर्टात याचिका

वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाचा घोळ; महाराष्ट्र सरकारविरोधात हायकोर्टात याचिका

वैद्यकीय प्रवेशाच्या अभ्यासक्रमांच्या निकालाच्या घोळाचा मुद्दा अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील विद्यार्थिनीने यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय आणि सीईटी सेलविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची नोंद घेत न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे. गट ब अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांची घोषणा 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांपूर्वीच करण्यात आली आहे. यावर याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे.

याचिकाकर्ती पूर्वा वाघ ही विद्यार्थीनी वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छित आहे. तिला अभ्यासक्रमांच्या निकालातील घोळाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाच्या घोषणेत मोठा घोळ घालण्यात आला असून त्याचा फटक बसून मला वैद्यकीय प्रवेशाची संधी गमावावी लागली आहे, असा दावा तिने केला आहे. पूर्वा वाघ हिने वकील राहुल कामेरकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिला गट अ अभ्यासक्रमांच्या निकालात प्रवेश मिळाला आहे. तथापि, गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीचा निकाल गट अ निकालापूर्वी जाहीर करण्यात आल्याने पुढील फेरीत सहभागी होण्यास मनाई केली गेली आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

याप्रकरणी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली आणि सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. तिसऱ्या फेरीतील प्रवेश आधीच पूर्ण झाल्याची माहिती सीईटी सेलच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली. त्याची नोंद घेत न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी निश्चित केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंबोज-सुथारचा यशस्वी पाठलाग; दक्षिण आफ्रिकन ‘अ’ संघाविरुद्ध थरारक कसोटी विजय कंबोज-सुथारचा यशस्वी पाठलाग; दक्षिण आफ्रिकन ‘अ’ संघाविरुद्ध थरारक कसोटी विजय
कधी कधी क्रिकेट ही फक्त चेंडू आणि बॅटची झुंज नसते, ती धैर्य, संयम आणि विश्वासाची कसोटी असते. बंगळुरूच्या सेंटर ऑफ...
डॉ. आंबेडकर, फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांची बदनामी भोवणार, भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांविरुद्ध कार्यवाही करण्यास न्यायालयाची मुभा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील खानपान सेवा, पुरवठादारावर पुन्हा ‘छत्रछाया’
मतदार याद्यांमध्ये घोळ… आयोगाला लाज वाटली पाहिजे; शिंदे गटाच्या आमदारांचा सरकारला घरचा आहेर
संजय राऊत यांना प्रकृती स्वास्थ्य लाभो! वारकऱ्यांचे पंढरीच्या पांडुरंगाला साकडे
भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस