अडीच लाखांची रोकड आणि रेशनची लालूच, नराधम मातेच्या संमतीनेच दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
अडीच लाख रुपयांची रोकड आणि महिनाभराचे रेशन या बदल्यात एका नराधम मातेने आपल्या दहा वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याची संतापजनक घटना तळोजा परिसरात घडली आहे. मूळ लंडन येथे स्थायिक असलेल्या आणि सध्या तळोजा येथे राहणाऱ्या एका 70 वर्षीय नराधमाच्या घरी ही निर्दयी आई आपल्या मुलीला सोडून जात होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकृत वृद्धासह या नराधम मातेला अटक करून मुलीची सुटका केली आहे.
मूळ पाँडेचेरी येथील असलेला फारूक शेख (70) हा सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत आहे. त्याचे तळोजा फेज 2 मधील सेक्टर 20 मध्ये एकता डेव्हलपरमध्येही घर आहे. या ठिकाणी या दहा वर्षांच्या चिमुरडीवर तो दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता. या चिमुरडीची शेखबरोबर ओळख झाली. घर भाड्याने घेण्यासाठी त्याने तिला अडीच लाख रुपये दिले. तसेच तिला महिन्याचे रेशनिंगही तोच भरून देत होता. त्या बदल्यात ही निर्दयी माता आपल्या दहा वर्षीय मुलीला रात्री शेखच्या घरी सोडायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेण्यासाठी यायची. ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून शेखच्या घरावर छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी पीडित मुलगी आणि शेख आढळून आले. शेख या मुलीला दारूही पाजत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेख आणि निर्ययी मातेला अटक केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List