Crime news- विविध राज्यांमध्ये ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क, दुबईतून मुख्य सूत्रधाराला अटक
दुबईत बसून देशातील विविध राज्यांमध्ये ड्रग्जचे उत्पादन करून तस्करीचे नेटवर्प चालवणाऱयाला हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांनी बेडय़ा ठोकल्या. सलीम शेख ऊर्फ शेरा असे त्याचे नाव असून त्याला दुबई येथून अटक केली. त्याला पुढील तपासासाठी घाटकोपर अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने तीन वर्षांत तीन एमडीचे कारखाने तयार केले होते.
मुंबई सेंट्रल पूर्व येथे काही जण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली. त्या माहितीची शहनिशा करून तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी मोहम्मद शफीला अटक केली होती. त्याच्याकडून 995 ग्रॅम एमडी आणि सवा लाख रुपये जप्त केले होते. या गुह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत सलमानचे नावसमोर आले होते. चौकशीदरम्यान सलमान हा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले.
सलमान हा दुबईतून ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. त्याच्या अटकेसाठी घाटकोपर अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱयाने विशेष मोहीम हाती घेतली. तो दुबई येथे राहत असल्याने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर त्याला दुबई येथे अटक करून हिंदुस्थानात आणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याला पुढील तपासासाठी घाटकोपर युनिटकडे सोपवण्यात आले.
- शेराविरोधात मुंबईसह विविध राज्यांत गुन्हे दाखल
- 2015 रोजी त्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली होती.
- अटक केल्यावर त्याला जामीन मंजूर झाला होता.
- ड्रग्जच्या पैशातून कोटय़वधी रुपये कमवले.
- वाहन अपघातांत दोघांचा मृत्यू
मालाड आणि कांदिवली येथे वाहन अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. करंतू यादव आणि हर्षा कोठारी अशी त्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कांदिवली आणि बांगूर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अपघातप्रकरणी डंपरचालकाला बांगूर नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहिला अपघात शनिवारी सकाळी मालाड परिसरात घडला. हर्षा ही बोरिवली परिसरात राहत असून आपल्या मुलीसह मोटरसायकलने एका
मॉलमध्ये खरेदीसाठी जात असताना समोरून आलेल्या सिमेंटच्या मिक्सरने त्यांना धडक दिली यात तिचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात पहाटे चार वाजता कांदिवली परिसरात घडला. अंधेरीतील करंतू यादव हा मोटरसायकलने जात होता. त्याला स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने तो खाली पडला. तेव्हा समोरून येणाऱया डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक हा पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी कांदिवली पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
- गुंतवणुकीच्या नावाखाली केली फसवणूक
संगणक प्रोसेसरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते डोंगरी येथे राहतात. तेथेच राहणाऱया एकाचा केबलचा व्यवसाय आहे. त्याच दरम्यान त्याची ओळख झाली. तक्रारदाराला परदेशातून संगणक आणि
लॅपटॉपचे प्रोसेसर आणून त्याच्या विक्रीतून चांगला फायदा होईल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने 13 लाख 74 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.
- खंडणीसाठी केले भावोजीचे अपहरण
सहकाऱयाना टीप देऊन मेहुण्याने भावोजीचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. ते एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. 26 ऑगस्टला ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. एका परिसरातून ते गॅस सिलिंडर काढत असताना तीन जण तिथे आले. गॅस सिलिंडरची चोरी करत असल्याचे सांगून त्याचे अपहरण केले. त्यांना आरे का@लनी येथे नेले. गॅस
सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचे भासवून खंडणी उकळली. त्यानंतर त्या तिघांनी तक्रारदार यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. भीतीपोटी त्याने आणखी 50 हजार रुपये ऑनलाइन घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी याच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश गुरव, उपनिरीक्षक आनंदराव काशीद, बडे, जाधव, लोखंडे, अवघडे, सिंगने, शिंदे आदी पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक जण हा तक्रारदार याचा नातेवाईक आहे. त्याने खंडणीसाठी हा कट रचल्याचे समोर आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List