करुण नायरची द्विशतकी आठवण
कर्नाटकचा अनुभवी फलंदाज करुण नायरने रणजी करंडकात दमदार फॉर्म कायम ठेवत केरळविरुद्ध 389 चेंडूंत 233 धावा ठोकल्या. त्याने या खेळीसह बीसीसीआयच्या निवड समितीला पुन्हा एकदा आपली आठवण करून दिली आहे. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर नायरने कृष्णन श्रीजीतसोबत 124 आणि रविचंद्रन स्मरणसोबत नाबाद 297 धावांची भागीदारी करत कर्नाटकला मजबूत स्थितीत पोहोचवले. 33 वर्षीय नायरसाठी ही खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे, कारण दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी त्याचा फॉर्म राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधणारा ठरू शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List