तुर्भ्यात शौचालयांची दुरवस्था, पालिकेच्या निषेधार्थ शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम
तुर्भे विभागातील इंदिरानगर, बगाडे कंपनी, चुना भट्टी, बोनसरी परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या भागात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दयनीय अवस्थेला जबाबदार असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.
तुर्भे विभागातील एमआयडीसीत असलेल्या झोपडपट्ट्यांकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. शौचालयांना दयनीय अवस्थेतून तातडीने बाहेर काढण्यात यावे या मागणीसाठी उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या आंदोलनात उपशहरप्रमुख सिद्धाराम शिलवंत, विभागप्रमुख इस्माईल शेख, उपविभागप्रमुख अन्वर खान, जितू गायकवाड, जयेश कांबळे, कार्तिक पिल्लई, उपशाखाप्रमुख इम्रान शेख, शाखा युवाधिकारी सुनील स्वामी, महाराजा पिल्लई, भागवत हिवाळे, जमाल शेख, सज्जात कोतवाल, कैफ शेख, करण काळे, पवन रणदिवे, किशोर रणदिवे, राहुल ठाकूर, आप्पासाहेब गुरव आदी सहभागी झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List