मुंबईत आमचाच महापौर होऊ दे! श्री देव वेताळाला साकडे

मुंबईत आमचाच महापौर होऊ दे! श्री देव वेताळाला साकडे

‘मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे’ असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री देव वेताळाच्या चरणी घातले. मागाठाणे येथे शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह या जत्रोत्सवाला भेट दिली. जत्रोत्सवात श्री देव वेताळाचे मंदिर साकारण्यात आले आहे. तिथे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी जुनी आठवण सांगितली. ‘2012 मध्ये इथेच आपण गाऱहाणे घातले होते की, मुंबईत शिवसेनेचाच महापौर होऊ दे आणि त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले होते. तसेच गाऱहाणे आता श्री देव वेताळाला घातले आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मला विश्वास आहे, बाकी कुणी ऐको न ऐको, पण देव आपला आहे आणि तो आपले ऐकल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. आपला मोर्चा झाला. त्यानंतर आता सर्वांनी सावध राहिले पाहिजे. नाहीतर मुंबईत आता जेवढे दिसतोय तेवढे पण पुढील पाच वर्षांत दिसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जुने कार्यकर्ते आजही धडपड करत आहेत, कारण संघर्ष म्हटला की मराठी माणूस मागे हटत नाही. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द, तीच हिंमत आपल्याला दिलेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा...
बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
सहा वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘या’ रहस्यमय चित्रपटात दिसणार केमिस्ट्री
मद्यधुंद व्यक्तीने तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकले; आरोपीला अटक
पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
कोलकत्ता हादरलं, 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार; आरोपीला अटक
ट्रम्प यांची नवी खेळी! पुतिन, जिनपिंग यांचे केले कौतुक; या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार कठीण असल्याचे केले स्पष्ट