सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह

सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नौदलासाठी विकसित केलेलं सीएमएस-03 उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. यामुळे लष्करी दळणवळण उपग्रह नौदलाची नेटवर्प-केंद्रित युद्ध क्षमता आणि देखरेखीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. सीएमएस-03 हा हिंदुस्थानचा आतापर्यंत सर्वात ताकदवान असा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जो सागरी क्षेत्राच्या सुरक्षेला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल, असं म्हटलं जात आहे.

सीएमएस-03 हा एक मल्टी बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे. ज्याला जमीन आणि विस्तृत सागरी क्षेत्रांमध्ये सेवा देण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. सुमारे 4400 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह हिंदुस्थानचा सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे.

कार्य आणि महत्त्व

हिंद महासागर क्षेत्रात चीनकडून निर्माण होत असलेल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर लष्करी समन्वय, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि धोक्याला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रगत दळणवळण खूप महत्त्वाचं ठरतं. सीएमएस-03 अनेक फ्रिक्वेन्सी बँड वापरतो, ज्यामुळे तो एकाच वेळी आवाज, व्हिडीओ आणि डेटा प्रसारित करू शकतो. यामुळे भारताच्या किनारपट्टीपासून 2000 किमी पर्यंत पसरलेल्या हिंद महासागर प्रदेशातील नौदल जहाजे, पाणबुडय़ा, विमाने आणि किनारी कमांड सेंटर्स यांच्यात अखंड संवाद साधता येईल.

हा उपग्रह संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात, ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे तसेच लक्षद्वीप बेटांचा समावेश आहे, सतत उच्च-बँडविड्थ दळणवळण कव्हरेज प्रदान करेल. याव्यतिरिक्त अधिक शक्तिशाली ऑम्प्लिफायर आणि संवेदनशील रिसीव्हर्समुळे सुसज्ज असलेला हा उपग्रह कठीण परिस्थितीतही विश्वसनीय संवाद कायम राखेल. हा उपग्रह पाळत ठेवणे, गुप्तचर माहिती, नेव्हिगेशन आणि हवामान निरीक्षण यासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंबोज-सुथारचा यशस्वी पाठलाग; दक्षिण आफ्रिकन ‘अ’ संघाविरुद्ध थरारक कसोटी विजय कंबोज-सुथारचा यशस्वी पाठलाग; दक्षिण आफ्रिकन ‘अ’ संघाविरुद्ध थरारक कसोटी विजय
कधी कधी क्रिकेट ही फक्त चेंडू आणि बॅटची झुंज नसते, ती धैर्य, संयम आणि विश्वासाची कसोटी असते. बंगळुरूच्या सेंटर ऑफ...
डॉ. आंबेडकर, फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांची बदनामी भोवणार, भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांविरुद्ध कार्यवाही करण्यास न्यायालयाची मुभा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील खानपान सेवा, पुरवठादारावर पुन्हा ‘छत्रछाया’
मतदार याद्यांमध्ये घोळ… आयोगाला लाज वाटली पाहिजे; शिंदे गटाच्या आमदारांचा सरकारला घरचा आहेर
संजय राऊत यांना प्रकृती स्वास्थ्य लाभो! वारकऱ्यांचे पंढरीच्या पांडुरंगाला साकडे
भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस