नारायणा हेल्थचं आणखी एक दमदार पाऊल… यूकेतील प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटलचं अधिग्रहण
देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सुलभ आणि माफक दरात आरोग्य सेवा देणाऱ्या नारायणा हेल्थने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जागतिक दर्जाच्या या हेल्थकेअरने यूकेतील प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटलचं अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. या अधिग्रहणाच्या द्वारे नारायणा हेल्थने यूकेतील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात पाऊलच टाकलं आहे. हा प्रॅक्टिस प्लस ग्रुप 12 रुग्णालये आणि सर्जिकल केंद्राचं संचालन करतो. उच्च गुणवत्ता असलेली ऑर्थोपेडिक्स, नेत्र चिकित्सा आणि सामान्य सर्जरी करण्याचा या ग्रुपचा हातखंडा आहे. या अधिग्रहणाद्वारे नारायणा हेल्थकेअरचं वैश्विक स्तरावर आगमन झालं आहे. या कंपनीचा महसूल पाहिला तर देशातील टॉप थ्रीमध्ये या हेल्थकेअरचा नंबर लागतो.
प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटल यूकेतील पाचवा सर्वात मोठा खासगी हॉस्पिटल ग्रुप आहे. या हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सुमारे 80 हजार सर्जरी केल्या जातात. आता या हॉस्पिटलचं अधिग्रहण केल्याने नारायणा हेल्थचा यूकेतील आरोग्य सेवेच्या मार्केटमध्ये शिरकाव झाला आहे. येत्या काही काळात यूकेत खासगी क्षेत्रात सर्जरीची मागणी वाढण्याची अधिक शक्यता आहे. दोन्ही संस्थांचा दृष्टीकोण आणि मूल्य प्रणाली समान आहेत. आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ आणि माफक दरात असावी हा त्यांचा हेतू आहे.
या अधिग्रहणानंतर नारायणा हेल्थचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटल्स आणि सर्जिकल सेंटर्सचे अधिग्रहण हे नारायणा हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. जसे नारायणा हेल्थ आहे, तसेच प्रॅक्टिस प्लस ग्रुपलाही हे जाणवले की, बहुतांश रुग्णांना आरोग्यसेवा मिळवणे कठीण जाते, केवळ काही लोकच महागड्या खासगी आरोग्यसेवा घेऊ शकतात. आम्ही दोघांनीही त्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम केले आहे जे या दोन्ही टोकांच्या मधोमध अडकले आहेत आणि त्यांना एक नवीन, परवडणारा खासगी आरोग्यसेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही एक आदर्श भागीदार आहोत, आणि मला प्रॅक्टिस प्लस ग्रुपचे नारायणा हेल्थ परिवारात स्वागत करताना आणि अधिकाधिक रुग्णांना मदत करताना अत्यंत आनंद होत आहे, असं डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी सांगितलं.
प्रॅक्टिस प्लस ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम ईस्टन यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उच्च गुणवत्ता, कुशल आणि मानवीय दृष्टीकोण असणारी आरोग्य सेवा यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात डॉ. शेट्टी आणि नारायणा हेल्थची उच्च प्रतिष्ठा आहे. आणि मला उत्सुकता आहे की प्रॅक्टिस प्लस ग्रुपची रुग्णालये आणि सर्जिकल सेंटर्स नारायणा हेल्थच्या बांधिलकी आणि तज्ज्ञतेसह एकत्र येऊन बरंच काही साध्य करू शकतात, असं जिम ईस्टन म्हणाले.
एकीकरणासह नारायणा हेल्थ आता प्रॅक्टिस प्लस ग्रुपच्या रुग्णालय विभागाला आपल्या पारिस्थितिकी तंत्रातही समाविष्ट करण्याच्या स्थितीत आहे. आपल्या मजबूत तंत्रज्ञानाचा वापर करून नवाचार, परिचालन उत्कृष्टता आणि दीर्घकालिक मूल्य सूजनाला पुढे नेऊन रुग्ण आणि भागिदारांच्या हितासाठी हा ग्रुप झटणार आहे.
नारायणा हेल्थ बाबत…
नारायणा हेल्थची स्थापना डॉ. देवी शेट्टी यांनी केली असून ज्याचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. नारायणा हेल्थ हे जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. भारतातील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा प्रदात्यांपैकी एक म्हणून नारायणा हेल्थ भारत आणि कॅरिबियन बेटांमध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि सुपर-स्पेशालिटी तृतीयक आरोग्यसेवा सुविधांची विस्तृत शृंखला चालवते.
विविध वैद्यकीय क्षेत्रांतील उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence), 18,822 समर्पित व्यावसायिकांची टीम (ज्यात 3,868 कुशल डॉक्टर आणि तज्ज्ञांचा समावेश आहे) आणि रुग्णकल्याण तसेच नैदानिक उत्कृष्टतेवरील त्याचे अखंड लक्ष यांमुळे नारायणा हेल्थ हे आरोग्यसेवा उद्योगातील आशा आणि उपचाराचे प्रतीक बनले आहे. नारायणा वन हेल्थ (NH Integrated Care) आणि नारायणा हेल्थ इन्शुरन्स या नारायणा हेल्थच्या सहाय्यक कंपन्या आहेत.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List