सुलतान जोहर कप हॉकी – हिंदुस्थानचा ब्रिटनवर थरारक विजय

सुलतान जोहर कप हॉकी – हिंदुस्थानचा ब्रिटनवर थरारक विजय

हिंदुस्थानी ज्युनियर पुरुष हॉकी संघाने सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने ब्रिटनवर ३-२ गोल फरकाने थरारक विजय मिळविला.

हिंदुस्थानकडून कर्णधार रोहित (४५व्या, ५२व्या मिनिटाला) आणि रवनीत सिंग (२३व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी मायकल रायडन (२६व्या मिनिटाला) आणि कॉनर ड्रेस्सी (४६व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

पाहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक हॉकी सादर केली; परंतु कोणालाही गोल करता आला नाही. हिंदुस्थानला १३व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉ र्नर मिळाला, जो ब्रिटिश बचावाने रोखला. २२व्या मिनिटाला मनमीत सिंगचा शॉट गोललाइनवरून क्लिअर करण्यात आला; पण लगेचच रवनीत सिंगने अप्रतिम फिनिशसह हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. २६व्या मिनिटाला मायकल रायडनने ब्रिटनसाठी समतोल गोल साधला आणि मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

४५व्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार रोहितने स्ट्रिक ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल करत हिंदुस्थानला पुन्हा आघाडी स्पर्धा मिळवून दिली. ४६व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्यावर कॉनर ड्रेस्सीने गोल करत स्कोर २-२ केला.

यानंतर हिंदुस्थानने सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यातील तिसऱ्या संधीवर ५२व्या मिनिटाला रोहितने जोरदार शॉट मारत निर्णायक गोल केला आणि हिंदुस्थानला सामना ३-२ ने जिंकून दिला. हिंदुस्थानचा पुढील सामना आज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
अहिल्यानगरमध्ये राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला...
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 21 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण, 18 शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे कुर्नुलचा अपघात, पोलिसांची माहिती
दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी
Bihar Election – नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा
टायर फुटल्याने धावती एसी बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 40 प्रवासी थोडक्यात बचावले
पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?