घटना धक्कादायक पण आमच्यासाठी विषय संपला, सरन्यायाधीश गवई म्हणाले…

घटना धक्कादायक पण आमच्यासाठी विषय संपला, सरन्यायाधीश गवई म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या बूटफेकीच्या घटनेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘‘ती घटना माझ्यासाठी आणि माझे सहकारी विनोद चंद्रन यांच्यासाठीही धक्कादायक होती, पण आमच्यासाठी आता तो विषय संपला आहे,’’ असे गवई म्हणाले.

एका सुनावणीदरम्यान अ‍ॅड. गोपाळ शंकरनारायणन यांनी दहा वर्षांपूर्वी न्यायालयात घडलेल्या एका अनुचित घटनेची आठवण सांगितली. त्या वेळी सरन्यायाधीश गवई यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

हल्लेखोर राकेश किशोर याच्यावर कुठलीही कारवाई न करण्याच्या गवई यांच्या भूमिकेशी न्या. उज्ज्वल भुयान यांनी असहमती दर्शवली. ‘‘माझे या सगळ्या प्रकारावर स्वतःचे मत आहे. ज्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, हा काही जोक नाही. ही गोष्ट कधीही विसरता येण्यासारखी नाही. हल्लेखोर व्यक्तीला त्याच्या कृत्याचा काहीही पश्चात्ताप नाही. हा संस्थेचा अपमान आहे,’’ असे न्या. भुयान म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;