हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी आहारात हे पदार्थ समाविष्ट करावेत, वाचा

हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी आहारात हे पदार्थ समाविष्ट करावेत, वाचा

आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात. कॅल्शियममुळे स्नायूंमधील शिथिलता तसेच रक्तसंचय योग्यरीतीने होण्यास मदत होते. म्हणूनच आवश्यक प्रमाणात कॅल्शियम सेवन करायलाच हवे. सामान्य व्यक्तींसाठी दररोज 1 हजार ते दीड हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

मोहरीचे तेल चेहरा आणि केसांसाठी का आहे फायदेशीर, जाणून घ्या

 वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या हाडांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते. वयोमानापरत्वे हाडांची झीज ही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या आहारात अतिरिक्त कॅल्शियम ठेवणे हे कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय आहे.

महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही फार मोठ्या प्रमाणात असते. खासकरून चाळीशीच्या जवळपास पोहोचताना हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पद्धतीने कॅल्शियमचा समावेश असणे गरजेचे आहे.

चेहऱ्याचे सौंदर्य खिलवण्यासाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा

कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ

सोयाबीनपासून तयार झालेल्या टोफूमध्येही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे टोफूचा आहारात आठवड्यातून एकदा तरी समावेश करावा. कॅल्शियम वाढीसाठी सोया दूध हाही एक उत्तम पर्याय आहे.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

जेवल्यानंतर लगेच का झोपू नये, वाचा

गुळ चणे हा कॅल्शियमचा एक भन्नाट पर्याय आहे. रोज एक गुळाचा खडा आणि थोडे चणे खाल्ल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.

दूध, चीज आणि दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणूनच दिवसातून एकदा तरी या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

रोज सकाळी बदाम खाणे किंवा बदाम दूध पिणे हा एक उत्तम कॅल्शियमचा स्त्रोत मानला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
आजच्या काळात अनेकांना त्वचेच्या संबंधित समस्यांनी ग्रासलेले आहे. परंतू आयुर्वेदातील पतंजलीची दिव्य डर्माग्रिट हे औषध यावर फायदेशीर असल्याचे म्हटले जात...
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा
Asia Cup 2025 – मोहसीन नक्वी ACC कार्यालयातून ट्रॉफी घेऊन गायब!
हरयाणात भाजपचे ऑफिस बांधण्यासाठी झाडं तोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
उड्डाण घेताच विमान कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी, दोघांचा होरपळून मृत्यू; दोन जण गंभीर भाजले
उत्तर प्रदेशमध्ये महिला भाजप नेत्याचे आंदोलन, गुंडांनी पती आणि मुलाला मारल्याचा केला आरोप
‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या