भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चोरीचा गुन्हा
गॅरेजमध्ये घुसून चोरी करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल अडसूळ व मनीष हिंगोरानी अशी दोघांची नावे आहेत. या दोघांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने हिराघाट परिसरात असलेल्या जय अंबे ऑटो गॅरेजचे लॉक तोडून दुकानातील साहित्य चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी दोन भाजप कार्यकर्त्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला.
मॅकेनिक रामराज जैसवार व रामयाद चौहान यांनी हे गॅरेज गुरप्रीत कौर उर्फ पूजा पठारे यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. मात्र गुरप्रीत यांचा कुटुंबियांसोबत जागेचा वाद झाल्यानंतर रामराज व रामयाद यांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना भाजप कार्यकर्त्यांनी बळजबरी घुसून दुकानातील मशीन, सीसीटीव्ही व डीव्हीआर मशीन चोरून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List