Latur News – औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, आई-वडिलांचा आधार हरपला

Latur News – औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, आई-वडिलांचा आधार हरपला

औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात बहिण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांना आधार द्यायच्या वयात मुलांचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे औसा तालुका हादरून गेला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, वाघोली येथील प्रसाद पद्माकर शिंदे (25) आणि त्याची बहीण गायत्री पद्माकर शिंदे (23) हे दोघे दुचाकीवरून लातूरला फॉर्म भरण्यासाठी जात होते. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील देवयानी साडी सेंटरच्या जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दोघेची दुचाकीवरून खाली पडले आणि याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोघांनाही चिरडले. या अत्यंत भीषण अपघातात बहीण आणि भावाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (07 ऑक्टोबर 2025) दुपारी 12 च्या दरम्यान घडलेल्या या घटनेने शिंदे कुटुंबाचा आधारा हरपला आहे. या घटनेमुळे वाघोली गाव शोकसागरात बुडालं आहे. अधिक तपास औसा पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;