गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या

गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता,  भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या

गाझा पट्टीवर नियंत्रण राखण्यासाठी हमासने आता क्रूर कदम उचलले आहे. आठ लोकांना भरचौकात फाशी दिली आहे. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा दिला आहे. मात्र हमासने आठ जणांना इस्त्रायलचे सहकारी सांगून गोळी मारली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा देऊनही ही कारवाई करण्यात आली आहे.

इस्त्रायली सैनीक बाजूला झाल्यावर हमासने गाझामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदी करावी अन्यथा अमेरिका त्यांच्यावर कारवाई करेल असा इशारा दिला होता. मात्र तरीही हमासने हे कृत्य केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये हमासचे बंदूकधारी आठ जणांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत, ज्यांना या गटाने इस्रायली सहयोगी आणि गुन्हेगार म्हणून सांगितले आहे.

सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या व्हिडीओत आठ लोकांना भयंकर पद्धतीने मारण्यात आले आहे. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत असून गुडघ्यांवर रस्त्यावर बसायला भाग पाडले आहे. हमासने एक एक करुन त्यांना गोळी घातली.  हमासने विना पुरावे ती लोक इंस्त्रायलसोबत काम करत असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;