माझ्यावर काळी जादू झालेली, तीन चित्रपट हातचे गेले! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
‘विवाह’, ‘मै हू ना’, ‘इश्क विश्क’ या सुपरहिट सिनेमातील अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणाऱ्या अमृता रावने नुकतेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. यात तिने काळ्या जादूबाबत मोठा खुलासा केला आहे.माझ्यावर काळी जादू झालेली, तीन चित्रपट हातचे गेले असे सांगितले.
रणवीर इलाहाबादिया याने त्याच्या पॉडकास्टसाठी अमृताची नुकतीच मुलाखात घेतली. त्यावेळी त्याने तिला काळ्या जादूबाबत एक प्रश्न विचारला. त्यावेळी रणवीर बोलतो साधे आणि मोकळ्या मनाच्या लोक काळ्या जादूने प्रभावित होतात. त्यावर अमृता तिचा अनुभव सांगताना म्हणाली की, एक वेळ होती जेव्हा ती आपल्या गुरुंना भेटली होती. त्यांनी आशार्वाद दिला. त्यानंतर एक-दोन दिवसांनी माझ्या आईशी बोलून तुमच्या मुलीवर काळी जादू केल्याचे सांगितले. मी या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. मात्र गुरुंनी सांगितल्याने मला ते पटले.
ती पुढे म्हणाली ” माझ्या गुरुंवर माझा विश्वास आहे. त्यांना काहीही मिळवण्याची इच्छा नाही. त्यांनी मला फक्त सत्य सांगितले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मला वाटले की कदाचित माझ्यावर काळी जादू झाली असेल. कारण आतापर्यंत, मी फक्त अन्य अभिनेत्रींकडून काळ्या जादूबाबत ऐकले होते. पण अमृताने स्पष्ट केले की तिला काळ्या जादूबाबत काही जाणवले नाही. मात्र काही नकारात्मक गोष्टी घडल्या.
अमृताने एक किस्सा सांगितला की, माझ्या आयुष्यात एक असे वळन आले की, मी तीन मोठे सिनेमे साईन केले होते. ते सर्व सिनेमे मोठ्या बॅनरचे होते. पण आश्चर्य म्हणजे ते तिन्ही सिनेमे बनले नाहीत. मी सायनिंग अमाऊंटही घेतली होती. मात्र तो प्रोजेक्ट बंद पडला आणि ती रक्कम मला पुन्हा द्यावी लागली. माझ्यासाठी ते फार ऑकवर्ड होते असेही ती म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List