पुणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार, पाहा कोणामध्ये होणार कांटे की टक्कर

पुणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार, पाहा कोणामध्ये होणार कांटे की टक्कर

Pune Loksabha : पुण्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण उत्सूक आहेत. या दरम्यान वसंत मोरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभेतून वसंत मोरे वंचितकडून लढणार अशी शक्यता आहे. आंबेडकरांसोबत चर्चा सकारात्मक झाल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत आणि आंबेडकरांनीही 2 एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. पुणे लोकसभेत महायुतीकडून मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनं तिकीट दिलंय. आता वसंत मोरे यांनीही उडी घेतली असून वंचितचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रकाश आंबेडकरांनी पहिली यादी जाहीर करुन स्वतंत्र लढण्याचे संकेत दिलेलेच आहेत. त्यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा थांबली आहे. त्यातच आता जरांगे पाटलांसोबत नवं समीकरण तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. 30 मार्चपर्यंत जरांगेंनी वेळ मागितला आहे. त्यामुळं पुढच्या 2 दिवसांत नवं समीकरण समोर येईल असं आंबेडकर म्हणत आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक चकमकही सुरु झाली आहे. राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत असल्याचा थेट आरोप आंबेडकरांनी केला आहे. इकडे रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या स्वतंत्र भूमिकेचं स्वागच करत दलित मतं भाजपलाच मिळणार असल्याचं म्हटलं आहे. आंबेडकरांनी स्वतंत्र लढावं पण दलित मतं माझ्यामुळं भाजपला मिळतील असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुण्यात नवी समीकरणं

लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा मतदारसंघात नवी समीकरणं जुळू लागले आहेत. त्यामुळे पुण्यात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतानाच काँग्रेसने येथून रविंद्र धंगेकरांचं नाव जाहीर करुन टाकलं. त्यामुळे वसंत मोरे यांना वंचितचा आता आसरा घ्यावा लागला आहे.

वसंत मोरे यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वसंत मोरे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. अधिकृत निर्णय ३१ मार्च पर्यंत  जाहीर करू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल यासाठी मी आताच चर्चा जाहीर करत नाही.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;