उदयनराजे यांचं नाव घेताच शरद पवार यांनी उडवली कॉलर; साताऱ्यात नेमकं काय घडलं?

उदयनराजे यांचं नाव घेताच शरद पवार यांनी उडवली कॉलर; साताऱ्यात नेमकं काय घडलं?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सातारा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शरद पवार यांनी आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. साताऱ्याच्या जागेपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तरे दिली. यावेळी शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवून दाखवली.

उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? असा सवालही शरद पवार यांना केला. उदयनराजेंसारखी कॉलर उडवणार का? असा सवालही यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे एकच हशा पिकला. आपल्या या नकलेवर खुद्द शरद पवारही दिलखुलास हसले. साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार राहणार आहे. उदयनराजेंनी आपल्याशी संपर्क केला नाही. उदयनराजे आता भाजपमध्ये आहेत. काल त्यांचं सातारकरांनी केलेलं स्वागत मी पाहिलं. रस्त्यावर गर्दी झाली होती, असं शरद पवार म्हणाले.

चव्हाणांना उमेदवारी नाही

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची जागा देणार का? असा सवालही करण्यात आला. त्यावर साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचाच उमेदवार इथे उभा राहील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वैद्यकीय कारणामुळे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे. निवडणुकीत संघर्ष करण्यासारखी त्यांची प्रकृती नाही. त्यामुळे साताऱ्याबाबत काय निर्णय घ्यायाच याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा घेण्यात आला आहे. दोन चार लोकांची नावे सुचवली गेली आहेत. संध्याकाळच्या बैठकीत अहवाल मांडून विचारविनियम केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाच नावे चर्चेत

शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर आणि श्रीनिवास पाटील यांचंही नाव साताऱ्यासाठी समोर आलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी आमची संध्याकाळी बैठक होत आहे, असं ते म्हणाले.

उमेदवारही पळवले जात आहेत

माढातून धनगर समाजाला तिकीट द्यावं अशी आमची इच्छा होती. महादेव जानकरांशी बोलणं झालं होतं. त्यांनी संमतीही दिली होती. पण नंतर काय झालं माहीत नाही. निवडणुकीत मतदार पळवतात, पण उमेदवारही पळवले जातात असं दिसतंय. त्यामुळे आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध घेत आहे. आमच्याकडे अनेकांचे अर्ज आले आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. पण सामाजिक जाण असलेल्यांना तिकीट द्यायची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वंचितने आमच्यासोबत यावं हा आमचा प्रयत्न आहे. आघाडींच्या बैठकांच्या काही चर्चेत मी नव्हतो. वंचितचा जागेचा काही इश्यू असू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;