IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाने ODI आणि टी-20 मालिकेसाठी संघाची केली घोषणा, हिंदुस्थानविरुद्ध वेगाचा बादशहा मैदानात उतरणार!
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेली दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर असा खेळला जाणार आहे. ही मालिका संपताच टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी जाणार आहेत. रोहित आणि विराटला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियानेही आपल्या संघाची घोषणा केली असून मिचेल मार्शची कर्णधारपदी निवड केली आहे. तसेच वेगाचा बादशहा मिचेल स्टार्कची सुद्धा वनडे संघात निवड करण्यात आली आहे.
आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या मिचेल स्टार्कची ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात निवड करण्यात आली आहे. हिंदुस्थानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याची घातक गोलंदाजी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. त्याचबरोबर या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सुद्धा खेळताना दिसणार आहेत. मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ आणि शुभमन गिलच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा संघ वनडे मालिकेत एकमेकांना भिडणार आहेत. तर टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Introducing our Australian Men’s squads for the ODI & T20I series against India
![]()
pic.twitter.com/6pSGjzUL01
— Cricket Australia (@CricketAus) October 7, 2025
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 19 ऑक्टोबर पासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पर्थमध्ये, दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडिलेडमध्ये आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना कॅनबरा, दुसरा टी-20 सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्न, तिसरा टी-20 सामना 2 नोव्हेंबर रोजी होबार्ट, चौथा टी-20 सामना 6 नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँड आणि पाचवा टी-20 सामना 8 नोव्हेंबर रोजी ब्रिसबेनमध्ये खेळला जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅट शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, झेवियर बार्टलेट, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुह्नेमन, मिचेल ओवेन, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List