फक्त पनीरच नाही तर, प्रथिनांनी समृद्ध हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी उत्तम, वाचा
शाकाहारींसाठी पनीर हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानला जातो. १०० ग्रॅम पनीरमध्ये अंदाजे १२ ते २० ग्रॅम प्रथिने असतात, जी तुमच्या दैनंदिन प्रथिनांच्या सेवनाची सहज पूर्तता करू शकतात. ते कॅल्शियम आणि लोहाचा देखील एक चांगला स्रोत आहे.
फक्त कडुलिंबच नाही… ही पानेदेखील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, जाणून घ्या
मसूर हा एक शाकाहरींसाठी उत्तम पर्याय मानला जातो. मसूरमध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असते. मसूर आणि हरभरा यामध्ये प्रथिने लक्षणीय प्रमाणात असतात. एकूण अंदाजे ८.२ ग्रॅम. मसूर हे फायबर आणि लोहाचा देखील चांगला स्रोत आहे. सोया दूध हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि विविध पोषक तत्वांनी समृद्ध असते. सोया मिल्कमधून आपल्याला कॅल्शियम, जीवनसत्त्वे डी आणि बी१२ देखील मिळते.
काजू हे उष्ण असतात. परंतु काजूमध्ये प्रथिनांचे प्रमाण हे अतिशय उत्तम असते. म्हणूनच मूठभर काजू बियांमध्ये ५ ते ७ ग्रॅम प्रथिने असतात. एका बदामात ६ ग्रॅम प्रथिने असतात. प्रथिनांव्यतिरिक्त काजूत फायबर, निरोगी चरबी आणि लोह देखील भरपूर असतात. म्हणूनच दिवसातून किमान एक काजू खाणे हे खूप गरजेचे मानले जाते.
क्विनोआ हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. त्यात सुमारे ८ ते ९ ग्रॅम प्रथिने असतात. क्विनोआ हे कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियमचा देखील एक चांगला स्रोत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List