महाराष्ट्रात 41 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर, जायकवाडी, उजनी, गंगापूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग

महाराष्ट्रात 41 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर, जायकवाडी, उजनी, गंगापूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग

राज्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सीना व भीमा नदी तसेच गोदावरी खोऱयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्या व ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जायकवाडी, येलदरी, उजनी, गंगापूर, गिरणा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे निर्माण होणाऱया पूरसदृश स्थितीमुळे 41 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी खोऱयात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पैठण परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे 8 हजार 29 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. जालन्यातील 8 हजार 500, बीडमधील 2 हजार, नांदेडमधील 1 हजार 20 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सीना आणि भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सोलापूरमधील 13 हजार 724 आणि धाराशीवमधील परांडा, भूम तालुक्यातील 3 हजार 957 नागरिकांचे स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

सोलापूर, धारशीवमधील पूरस्थिती लक्षात घेता स्थानिक पथकांबरोबर एनडीआरएफची प्रत्येकी 2 पथके तैनात करण्यात आली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगर या जिह्यांत प्रत्येकी एनडीआरएफचे 1 पथक तैनात करण्यात आले आहे. नांदेड, जळगावमध्ये एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी लष्कराच्या पथकांचीही बचाव कार्यासाठी मदत घेण्यात येत आहे.

धरण पाण्याचा विसर्ग

जायकवाडी 3,00,000 क्युसेक
येलदरी 29,400 क्युसेक
उजनी 75,000 क्युसेक
सीना कोळेगाव 80,000 क्युसेक
गंगापूर 11,000 क्युसेक
गिरणा 54,500 क्युसेक
हतनूर 55,800 क्युसेक

बारावीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज राज्य परीक्षा मंडळाने घेतला. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. परंतु मराठवाडा तसेच नाशिक, सोलापूर, अहिल्या नगर आणि अन्य काही जिह्यांमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

जिल्हा स्थलांतरित

सोलापूर 13,724
संभाजीनगर 8,029
जालना 8,500
बीड 2,000
धाराशीव 3,957
नांदेड 1,020
अहिल्यानगर 3,497

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. पण वारंवार तशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतील तर समजून...
Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन
अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले
आज मी निश्चिंत झोपेन….चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार
तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण स्मोकिंग सोडून द्या…, तुर्कीच्या राष्ट्रपतींचा सल्ला अन् मेलोनींच हटके प्रत्यु्त्तर चर्चेत
राहुल गांधी चंदीगडमध्ये; IPS अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन