राणा दाम्पत्य फडणवीसांच्या भेटीला, दुसरीकडे अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग

राणा दाम्पत्य फडणवीसांच्या भेटीला, दुसरीकडे अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग

Navneet Rana meet Fadnavis : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी जवळपास 1 तास चर्चा झाली. 4 एप्रिल रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

अभिजीत अडसूळ बंडखोरीवर ठाम

अभिजीत अडसूळ म्हणाले की, भाजप पदाधिकारी, बच्चू कडू, अजित पवार गट आणि सर्वच पक्षाचा नवनीत राणा यांना विरोध आहे. विरोध असताना देखील राणा यांना उमेदवारी दिली गेली. सर्व पक्षाच्या नेत्यांचा दबाब माझ्यावर आहे. ते मला उमेदवार व्हायला लावत आहे. उद्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल बाकी आहे. त्यामुळे राणा यांचा उमेदवारी अर्ज कधीही बाद होऊ शकतो. मी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही तक्रार करुनही उमेदवारी दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे.

मुख्यमंत्री आमचे नेते आहे.त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सांगून निर्णय घेतला जाईल पण तसं झालं नाही. नवनीत राणा यांना जरी भाजपने उमेदवारी दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरणार आहे. पाठीमागून सर्व पक्षाचे नेते माझ्या सोबत आहेत. भाजप पदाधिकारी यांच्या वर दबाव जरी आला तरी ते दाखवण्यासाठी प्रचार करतील. शेवटच्या दिवशी गेम करतील. पहिल्या दिवसापासून हा विरोध नवनीत राणा यांना आहे. विजय शिवतारे यांच्या बदल काय चालू आहे त्यात मी पडणार नाही. असं ही अडसूळ म्हणाले.

बच्चू कडू यांचा ही राणा यांना विरोध

दुसरीकडे वर्धा लोकसभा मतदारसंघातील प्रहारचे प्रमुख पदाधिकारी आमदार बच्चू कडू यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आमदार बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बच्चू कडू यांना केली आहे. अमरावती जिल्ह्यातील दोन मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली आहे. आमदार बच्चू कडू उद्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;