रामटेकमधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

रामटेकमधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण, काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. कारण बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असल्याने रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

रश्मी बर्वे यांनी 2020 वडिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र बनवले होते. मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र बनवताना देण्यात आलेले वडिलांचे शैक्षणिक कागदपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. राज्य सरकारने 22 मार्चला याप्रकरणी आदेश काढत चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी जिल्हा जात पडताळणी समितीचे अधिकारी गेल्या तीन-चार दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर गुरुवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांच्या घरावर एक नोटीस चिटकवली आणि 10 वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानंतरही रश्मी बर्वे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय घेत रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले होते.

रश्मी बर्वे यांच्याऐवजी आता श्यामकुमार बर्वे हे आता या जागेवर उमेदवार असतील असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुसळधार पावसाने चंद्रपुरातील रस्ते जलमय मुसळधार पावसाने चंद्रपुरातील रस्ते जलमय
अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात जनजीवन विस्कळीत झाले. गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत...
महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार कोल्हे यांना विजयी करा, राजेश टोपे यांचे आवाहन
जालना शहरात कचराकुंडीमध्ये आढळली शेकडो मतदान कार्डं
साडे आठ कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण, तुळजाभवानी संस्थानाच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मराठी भाषेचा मुद्दा पेटला, मराठमोळी अभिनेत्रीला संताप, चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे समोरासमोर
दिंडोरी लोकसभेत महायुतीतच वॉर, भुजबळांनी कांदेंना काय दिला सल्ला
अंधार दूर करायचा असेल तर, मनातली आणि EVM वरची मशाल पेटवा; मावळमध्ये आदित्य ठाकरे यांची झंझावाती सभा