‘बेस्ट’ला पालिकेचा ‘शॉक’; तीन हजार कोटींची मदत देण्यास पालिकेचा नकार

‘बेस्ट’ला पालिकेचा ‘शॉक’; तीन हजार कोटींची मदत देण्यास पालिकेचा नकार

मुंबई महानगरपालिकेने वारंवार शेकडो कोटींची आर्थिक मदत करून ‘आधार’ देणाऱया पालिकेने आता मात्र ‘बेस्ट’ला तीन हजार कोटींची आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. पालिकेने गेल्या काही वर्षांत ‘बेस्ट’ला आठ हजार कोटींची आर्थिक मदत दिली आहे तरीदेखील ‘बेस्ट’च्या उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही किंवा आर्थिक स्थितीही सुधारलेली नाही. त्यामुळे पुन्हा मदत देण्यास नकार देत आतापर्यंत दिलेल्या कोटय़वधींच्या मदतीचा हिशेब द्या आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, असे खडेबोलही पालिकेने ‘बेस्ट’ला सुनावल्याचे समजते.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती खालनल्याने कामकाजाकर मोठा परिणाम होत आहे. एकेकाळी स्कतःच्या पाच हजार बसेसची संख्या आता थेट 1097 पर्यंत खाली आली असून बेस्टकडे भाडेपट्टय़ावरील 1941 बस आहेत. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांकर आली आहे. आर्थिक स्थिती ढासळल्याने ही स्थिती ओढाकल्यामुळे पालिका ‘बेस्ट’ला दरवर्षी कोटय़कधीची मदत करीत आहे. सन 2014-15 पासून मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आठ हजार कोटींचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे, तर या वर्षी अर्थसंकल्पातही  नऊ हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा पालिका आयुक्तांकडून करण्यात आली आहे. ही मदत टप्प्याटप्प्याने ‘बेस्ट’ला मिळणारच आहे. मात्र या व्यतिरिक्त तीन हजार कोटींची मागणी बेस्टने पालिकेकडे केली होती. मात्र पालिका मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मदत देण्यास पालिकेने सफशेल नकार दिल्याचे समजते.

‘बेस्ट’ला पालिकेकडून अशी मिळतेय मदत

‘बेस्ट’च्या महाक्यकस्थापकांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्र लिहून बेस्टला उपक्रमाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच बेस्टच्या परिवहन विभागास अंदाजे दरमहा 150 कोटी ते 180 कोटी रुपये इतकी आर्थिक तूट असल्याचे नमूद केले आहे, तर जुलै 2023 पर्यंत एकूण आर्थिक तूट 744.95 कोटी रुपये एवढी असल्याचे नमूद केले आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते सन 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये क तरतुदींक्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एकढय़ा रकमेचे अधिदान महापालिकेने ‘बेस्ट’ला केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त