अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. यासंबंधित प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बालविवाह होताना आढळल्यास 1098 वर करावं संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार असल्याचेगी सांगण्यात आले आहे.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहर्तावर सामुदायीक तथा एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. या समारंभात बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्हयात लागु करण्यात आले आहेत.अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांचेस्तरावरून प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या मदत करणारे भंडारा जिल्हयातील “लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक, मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर,आचारी,मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक,बैंडवादक, कॅटरिंग चालक,विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेतांना मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण झाल्याची खातरजमा करूनच विवाह समारंभाची बुकीग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपुर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपुर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये बाल विवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो. ती व्यक्ती 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लाख रूपयापर्यंत असेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल.बाल विवाह सदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;