बंगळुरू महामार्गावरील फुलझाडांवर कुऱ्हाड; निसर्गप्रेमींतून तीव्र संताप

बंगळुरू महामार्गावरील फुलझाडांवर कुऱ्हाड; निसर्गप्रेमींतून तीव्र संताप

रखरखत्या उन्हात मनाला व नेत्रांना अल्हादायक व प्रफुल्लित करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडीतील दुभाजकामधील बहरलेल्या रंगीबेरंगी फुलझाडांवर प्रहार करीत ती छाटल्याने निसर्गप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दुभाजकात बहरलेली ही फुलझाडे या मार्गाची निसर्गशोभा वाढवीत होती. येथील रंगीबेरंगी फुलांमधील भ्रमराचा वाढता वावर पाहून निसर्गप्रेमी सुखावत होते. निसर्ग आणि मानवी जीवनाशी अतूट नाते व ऋणानुबंधाचा एक धागा विणला जात होता. अशा नयनरम्य बहरलेल्या दुभाजकातील फुलझाडांवर संबंधित विभागाने प्रहार करून निसर्गप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे बहरलेल्या फुलझाडांचा हा परिसर क्षणात विद्रूप व भकास झाला आहे. हिरव्यागार झाडांवर फुललेली फुले आता दुभाजकात कोमजून गेली आहेत. निसर्गद्रोह करणाऱया या वृत्तीचा निसर्गप्रेमींकडून निषेध व्यक्त होत आहे.

लिंबखिंड (सातारा) या परिसरातून लाखो प्रवासी व वाहनचालक प्रवास करताना बहरलेली रंगीबेरंगी फुलझाडे पाहून त्यांच्या मनाला खूप प्रसन्न वाटत होते. सुखकर प्रवासाचा आनंद फुलांकडे पाहून घेता येत होता. दुभाजकातील फुलझाडे तोडल्याने निसर्गप्रेमींच्या मनाला खूप यातना व दुःख होत आहे, अशी प्रतिक्रिया निसर्गप्रेमी कार्यकर्ते श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;