अजित पवारांच्या पक्षाला ‘या’ मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही, मोठी अपडेट

अजित पवारांच्या पक्षाला ‘या’ मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही, मोठी अपडेट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. असं असलं तरी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला त्यांच्याच पक्षाचं घड्याळ चिन्ह मिळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. पण ही बातमी महाराष्ट्र आणि नागालँडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत नाही. तर लक्ष्यद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आहे. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच अजित पवार गटाला महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये चिन्ह वापरायला तूर्तास परवानगी मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आता जवळ येत आहे. येत्या 19 एप्रिलला देशभरात लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार उतरवण्यात आलाय. पण लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

अजित पवार यांच्या पक्षाला दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंतच्या मतदान प्रक्रियेत घड्याळ चिन्ह देशभरात वापरता येणार आहे. पण पहिल्या टप्प्यात वापरता येणार नाही. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळणारच आहे. तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लक्ष्यद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह का मिळणार नाही?

चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही. इतर सर्व ठिकाणी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;