238 वेळा पडला, पण पठ्ठ्याने नाद नाही सोडला, लोकसभेच्या रिंगणात ठोकले शड्डू

238 वेळा पडला, पण पठ्ठ्याने नाद नाही सोडला, लोकसभेच्या रिंगणात ठोकले शड्डू

जगातील कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत कशासाठी उतरतो? तुम्ही म्हणाल अहो हा काही प्रश्न आहे का? निवडणुकीच्या आखाड्यात जिंकण्यासाठीच उतरत असतात. कोणाला वाटते आपण पराभूत व्हावे, नाही का. पण तामिळनाडूतील हा उमेदवार मात्र त्याला अपवाद आहे. ही व्यक्ती निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरते. या व्यक्तीने 10, 20 नाही तर आतापर्यंत 238 वेळा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. म्हणजे तो 238 वेळा पराभूत झाला आहे. तरीही ही व्यक्ती लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उतरणारच आहेत. कोण आहे ही व्यक्ती, कोणता रेकॉर्ड आहे त्यांच्या नावे?

के.पद्मराजन यांनी यशाचे तोंड पाहिलेच नाही

देशभरात निवडणुकीचा फड रंगला आहे. दिवसागणिक त्याची उत्सुकता वाढत आहे. तामिळनाडूमधील के पद्मराजन हे निवडणूक आली की सक्रिय होतात. 65 वर्षीय पद्मराजन यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांचे नशीब आजमावणार आहेत. तामिळनाडूमधील मेट्टूरचे पद्मराजन यांचा टायर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 1988 पासून ते निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते धर्मपुरी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. इलेक्शन किंग नावाने प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी राष्ट्रपती निवडणुकीत सुद्धा नशीब आजमावलं आहे.

पहिल्यांदा लोकांनी काढले वेड्यात

पद्मराजन हे पहिल्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले. तेव्हा लोकांनी त्यांची टर उडवली. त्यांच्यावर लोक हसले. सामान्य नागरिकाने निवडणूकीपासून चार हात लांब असावे, असा समज आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्ती कधी निवडणूक लढवू शकत नाही, या समजाला त्यांनी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा छेद दिला. या मानसिकतेविरोधात त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली.

  1. सर्वांविरोधात ठोकले शड्डू – पद्मराजन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीपासून ते मोदीपर्यंत त्यांनी अनेकांविरोधात निवडणूक लढवली. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे.
  2. तीन दशकांत एक कोटींहून अधिकचा खर्च – पद्मराजन यांच्या मते, त्यांच्यासमोर कोण उमेदवार आहे, याची त्यांनी कधीच चिंता केली नाही. मला पराभवाचा हा काफिला पुढे न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांत त्यांनी कित्येक निवडणूका लढविल्या. या तीन दशकांत एक कोटींहून अधिकचा खर्च केला. यामध्ये अमानत रक्कमेचा पण समावेश आहे. पराभव झाल्यानंतर अमानत रक्कम जप्त होते.
  3. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव – पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवल्या गेले आहे. ते भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार ठरले आहेत. त्यांनी 2011 मध्ये त्यांनी निवडणुकीत सर्वात जोरदार प्रदर्शन केले. मेट्टूर विधानसभा निवडणुकीत त्यांनी 6,273 मतं मिळवली होती. या ठिकाणाहून विजयी उमेदवाराला 75 हजारांहून जास्त मतदान मिळाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;