8 वर्षांची चिमुरडी नराधमांना भिडली, हाताला चावा घेत आरडाओरडा केल्यानं अपहरणाचा प्रयत्न फसला; कोल्हापुरातील नांदणीमधील थरार

8 वर्षांची चिमुरडी नराधमांना भिडली, हाताला चावा घेत आरडाओरडा केल्यानं अपहरणाचा प्रयत्न फसला; कोल्हापुरातील नांदणीमधील थरार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात येणाऱ्या नांदणी 8 वर्षीय मुलीने स्वत:च्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. स्वरा शितल देसाई असे या मुलीचे नाव आहे. दुर्गावतार घेतलेल्या या मुलीने अपहरणकर्त्यांच्या हाताचा करकचून चावा घेत आरडाओरडा केला. यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्री स्वरा देसाई या 8 वर्षाच्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या चिमुरडीने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आरडाओरड केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी हा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत.

स्वरा लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती. यावेळी तीन ते चार जण अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊदेखील घाबरला. प्रसंगावधान राखत स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून काही जण घराबाहेरही आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते शिरोळ मार्गावरून पोबारा केला.

पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिरोळ पोलिसांनी रात्री उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. पण अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच