‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?

‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?

सोशल मीडियावर ‘पीछे देखो पीछे’ या मीममुळे लोकप्रिय झालेला बालकलाकार अहमद शाहला तुम्ही ओळखतच असाल. त्याचा छोटा भाऊ उमर शाहच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अवघ्या काही क्षणांमध्ये त्याने आपले प्राण गमावले आणि डॉक्टरसुद्धा काहीच करू शकले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, उमरला अचानक कार्डिॲक अरेस्ट आला आणि त्याचं हृदय धडधडणं बंद झालं. अहमद शाहने त्याच्या इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहित छोट्या भावाच्या निधनाची माहिती दिली. इतक्या कमी वयात हृदयरोग किंवा कार्डिॲक अरेस्ट येणं, ही धक्कादायक बाब आहे. परंतु आता ही समस्या फक्त वृद्धांपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. तरुण वर्ग आणि लहान मुलांनाही हृदयरोगाचा सामना करावा लागतोय.

कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डिॲक अरेस्टला सामान्य भाषेत सांगायचं झालं तर अचानक हृदय धडधडणं बंद होणं. असं झाल्यावर रक्तप्रवाह थांबतो आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. कार्डिॲक अरेस्ट आल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार झाले नाही तर काही मिनिटांतच मृत्यू होऊ शकतो.

हार्ट अटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट यांमधील फरक

अनेकांना हार्ट अटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट हे दोन्ही एकच असल्याचं वाटतं. परंतु या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत.
हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
कार्डिॲक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके थांबतात. हे अनेकदा अचानक घडतं.

लहान वयात हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?

  • जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न आणि जास्त साखरेचं सेवन यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. परिणामी हृदयाच्या नसा ब्लॉक होऊ शकतात.
  • सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव ही सामान्य समस्या बनली आहे. सततच्या तणावामुळे शरीरात कॉर्टिसोलसारखे तणावाचे संप्रेरक वाढतात, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.
  • कॉम्प्युटर आणि मोबाइलवर तासनतास बसून राहिल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. व्यायामाचा अभाव असल्याने लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या कार्यावर दबाव येतो.
  • पुरेशी झोप न घेणंही हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी झोपेमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.
  • धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • हृदयविकार हा अनुवंशिकही असतो. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला हृदयरोग असेल तर तुम्हालाही धोका असू शकतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दुखणं, वेदना जाणवणं किंवा प्रचंड अस्वस्थ वाटणं.
  • श्वास घेण्यास त्रास जाणवणं.
  • शरीराच्या वरच्या भागात म्हणजेच मान, जबडा, पाठ किंवा डाव्या हातात वेदना जाणवणं.
  • अचानक खूप घाम येणं किंवा अशक्तपणा जाणवणं.

हृदय निरोगी कसं ठेवाल?

  • आहारात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. जंक फूड आणि जास्त गोड पदार्थ टाळा.
  • दररोज किमान 30 मिनिटं चालणं, सायकल चालविणं किंवा कोणताही व्यायाम करणं.
  • ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनं, ध्यानसाधना किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
  • तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोगाचा इतिहास असेल तर डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी करून घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने...
31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्याच पाहिजेत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?
Rain Update: जोरदार पावसामुळे जालना जलमय; अनेकांच्या घरात पाणी शिरले, विजेचा कडकडाटाने घबराट
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजूरी, अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय