एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे

एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे

एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम कार्डची गरज लागते, पण स्मार्टफोनचा वापर करूनही कॅश काढता आली तर किती बरे होईल ना… लवकरच गुगल पे, फोन पेसारख्या यूपीआयचा वापर करून कॅश काढता येणार आहे. सध्या यूपीआयवरून पैसे पाठवणे, बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग करणे सोपे आहे. आता लवकरच कॅश काढणेही शक्य होईल, असा दावा केला जातोय.

यूपीआय आणखी सहजसोपे आणि उपयोगी कसे बनेल यावर काम सुरू आहे. आपल्याला ठाऊक आहेच की, अनेक जण बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करतात. एनजीओ, स्वयंसहायता गट, मायक्रो फायनान्स संस्था किंवा इतर नागरी संस्था यांसारख्या संस्था बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. त्यांच्याकडे क्यूआर कोड असेल. आपल्या यूपीआयवरून हे क्यूआर कोड स्कॅन करायचे. त्यानंतर बँक करस्पॉन्डंट तुम्हाला कॅश देईल. तुमच्या खात्यातून पैसे कट होतील. ते बँक करस्पॉन्डंटच्या खात्यात जातील.

सध्या यूपीआयवरून कार्डचा वापर न करता पैसे काढण्याची सुविधा यूपीआय एनेबेल एटीएमवर उपलब्ध आहे. काही दुकानदार ही सुविधा देतात. त्या ठिकाणी फक्त एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपये काढू शकतो. ही सुविधा आता देशभरातील 20 लाखांपेक्षा जास्त बँक करस्पॉन्डंटपर्यंत पोहोचवायचा सरकारचा प्रयत्न आहे.

नॅशनल बँक करस्पॉन्डंटच्या माध्यमातून यूपीआयचा वापर करून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडे केलेली आहे. त्यावर अद्याप विचारविनिमय आणि नियोजन सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर यूपीआयमधून पैसे काढण्याची सुविधा सुरू झाली की, यूपीआय जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असे म्हटले जातेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता शरद पवार यांनाही माओवादी, नक्षलवादी ठरवणार का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल आता शरद पवार यांनाही माओवादी, नक्षलवादी ठरवणार का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
देवाभाऊ, शेजारी बघा, काय चालले आहे? असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक येथील सभेत मुख्यमंत्री...
राज्याच्या लुटीला फडणवीस, अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहेत; संजय राऊत यांचा घणाघात
माजी आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
‘या’ चहाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी आहे सर्वात उत्तम
Himachal News – मंडीमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये हे खायला विसरू नका, वाचा
कश्मीरचे सफरचंद संकटात! राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक वाहतूक कोंडीत अडकले, जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद